रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ

radio-vishwas प्रसारमाध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे. याद्वारे समुदायाच्या मुलभूत प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे. समुदायाचा विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ कार्यरत आहे. समुदायाच्या विकासासंबंधी विविध कार्यक्रमांची निर्मिती व त्याचे प्रसारण तसेच या प्रसारणामध्ये समुदायातील मुख्य प्रतिनिंधीचा सहभाग ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया येथे कार्यरत आहे. स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांसाठी सुरु केलेला हा अभिनव रेडिओ आहे. समाजप्रबोधन व शिक्षण हा याचा मुख्य उद्देश आहे.

नवोदित कलाकार, अभ्यासक, कार्यकर्ते यांना खुले व हक्काचे व्यासपीठ आहे. लोकशिक्षण व समाजाभिमुख माहितीचे प्रसारण, गरीब, बेरोजगार शेतकरी पीडित महिलांसाठी विविध योजनांची माहिती ज्ञान, कला संस्कृती व सामाजिक क्षेत्रातील घडामोडी, मनोरंजनाचे उपक्रम येथे सादर होतात. कम्युनिटी रेडिओ हे अल्पखर्चिक व अधिक उपयुक्त माध्यम असून, अन्य माध्यमांच्या तुलनेत अधिक परिणामकारक आहे. शहर, खेडे, वाडीपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची क्षमता या माध्यमात आहे. सुशिक्षित असो वा अशिक्षित, साक्षर असो वा निरक्षर, अगदी अबालवृद्धापर्यंत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओने आपुलकीचे नाते निर्माण केले आहे.

 
रेडिओ विश्वास 90.8 वर दैनंदिन प्रसारित होणारे कार्यक्रम

दिनविशेष, व्यक्तिविशेष, सुविचार या कार्यक्रमात प्रत्येक दिवसाचे दिनविशेष व त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तिविषयी माहिती व त्याने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येतो. त्याचबरोबर त्या दिवशी एक सुविचारही सांगितला जातो.

 
मुझे पंख दे दो

हा एक सामाजिक कार्यक्रम असून या कार्यक्रमात स्त्रीवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले जाते. स्त्रियांचे समाजात होणारे आर्थिक, शारीरिक शोषण आणि याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि स्वताचे अस्तित्व उमटविणार्‍या महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दात मांडली जाते. त्यामुळे समाजातील इतरही महिला ज्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने शोषण होत आहे त्यांना बळ आणि व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याची उर्जा मिळते. सौ.नीता सतिष कोठेकर या सामाजिक कार्यकर्त्या संबंधित शोषित आणि पीडित महिलांची या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेतात.

 
शहरी परसबाग

sahari-parsbaag

जिज्ञासा मनामनाची

jdnyasa-manamanchi

विश्वास स्पोर्टस् क्लब

vishwas-sport-club

बाळू ऑन एअर

baloo-on-air

 
वैज्ञानिक कुतूहल

vaidnyanik-kutahal

लेडीज कट्टा

ledis-katta

आमची संस्था

amachi-santha

जाणिव सामाजिकतेची

janiv-samajiktechi

 
तयारी स्पर्धा परीक्षांची

tayari-spardha-parikshechi

मैत्र कट्टा

radio-maitre-karva

आजीच्या गोष्टी

ajichya-gosti

तनिष्कांच्या भावविश्वात

tanishka-group

 
नातवंडांशी गप्पा

natvandanshi-gappa-tappa

स्वच्छतादूत

rag-picker

कायद्याच्या चौकटीतून

kaydyachya-chawkatitun

लढाई कॅन्सरशी

aragam-dhan-sampada

 
स्वान्तसुखाय

swantsukhay

पुस्तकाच्या पानातून

pustakachya-panatun

 
भारत भ्रमंती

भारत देश विविध परंपरा, संस्कृती, विविध भाषा, वेशभूषा, चालीरीतींनी नटलेला देश आहे. अशा विविधरंगी, विविधढंगी भारताला समजून घ्यायचे असेल तर पर्यटनाला पर्याय नाही. परंतू बर्‍याचदा काही वैययितक समस्या, अडचणींमुळे प्रत्येकालाच पर्यटन शक्य होत नाही किंवा ज्यांना शक्य होते त्या सर्वांना निवासाची, खानापानाची, सुविधांची माहिती अशा समुदायापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘भारत भ्रमंती’ या कार्यक्रमाची संकल्पना तयार झाली. या कार्यक्रमातून भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे व तेथील कला व संस्कृतीचा परिचय श्रोत्यांना करुन दिला जातो. पर्यटनाचा दीर्घ अनुभव असलेले श्री.शेखर चंदने हे सदर कार्यक्रम सादर करतात.

 
नाशिक रॉयल्स

हा कार्यक्रम कु.सोहम सहाणे सादर करतो. या कार्यक्रमामध्ये सोहम नवनवीन अ‍ॅप्लीकेशनबद्दल श्रोत्यांना माहिती देतो. सदर कार्यक्रम नाशिकमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.

 
कंट्रोल रुम

शहरात घडणार्‍या चेन स्नॅचींग, बालगुन्हेगारी, घरगुती हिंसाचार, घरफोड्या, किरकोळ कारणांमुळे होणारे खुन, सायबर क्राईम, खंडणी इत्यादी घटना घडल्यानंतर किंवा घडण्यापूर्वी पोलीस प्रशासनाला नेहमीच सतर्क असावे लागते. पोलिसांविषयी एक प्रकारची नकारात्मक मानसिकता जनसामान्यांमध्ये असते. ती प्रतिमा पुसण्यासाठी व पोलीस प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी कशा प्रकारे कार्यरत असते व पोलिसांची सकारात्मक बाजू जनतेसमोर यावी या हेतूने ‘कंट्रोल रुम’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

 
काय वाटतं बोला! ‘लाईव्ह शो’

दूरध्वनीद्वारे श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेता यावी या उद्देशाने ‘काय वाटतं बोला!’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. फोन इन कार्यक्रमाद्वारे श्रोते थेट कार्यक्रमात सहभागी होऊन सामाजिक किंवा दैनंदिन गोष्टींवर त्यांची मते व्यक्त करतात. आजपर्यंत या कार्यक्रमात तुम्ही तुमच्या मतदानाच्या हक्काविषयी.

 
जागरुक आहात का?

वृक्षांचे महत्त्व आणि आपली जबाबदारी, ऑनलाईन फसवणूक, लोडशेडिंग, डेज सिलेब्रेट करावेत का नाही?, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, इस्त्रोची भरारी, नैराश्य अर्थात डिप्रेशन, आजचा चित्रपट वास्तवापासून दूर जातोय का?, चैनस्नेचिंगचे वाढते प्रमाण इत्यादी विषयांवर श्रोत्यांनी त्यांची मते प्रदर्शित केली. दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जातो.

 
प्रशिक्षण उपक्रम

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ आणि ‘साऊन्ड एडीटींग’ कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळेत रेडिओ जॉकी संकल्पना, निवेदन, व्हाईस मॉड्यूलेशन, साऊंड एडीटींग सॉफ्टवेअरची माहिती देण्याबरोबरच प्रत्यक्ष सराव करवून घेण्यात येतो. प्रशिक्षणात विद्यार्थी, संस्था, संघटनेचे कार्यकर्ते, नोकरदार, शिक्षक, पालक व गृहिणी अशा विविध समुदायातील व्यक्तींचा सहभाग नोंदविला जातो. उपयुक्त तंत्रशिक्षित अनुभवी रेडिओकर्मी तयार करणे व जनसामान्यांना या क्षेत्रात स्थान मिळवून देणे हा या प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.

 

चित्रपट संगीतावरील कार्यक्रम

गीत गाता हूँ मैं

हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित करून त्यांच्या आवडीचे गाणे व त्या गाण्याची पार्श्‍वभूमी या कार्यक्रमात सांगितली जाते. स्थानिक लोकसहभागातून चालविलेला चित्रपट गीतांचा हा सुरेख असा सदाबहारदार कार्यक्रम आहे.

आज के कलाकार

या कार्यक्रमात प्रत्येक एपिसोडमध्ये विशिष्ट कलाकारावर चित्रित केलेली गाजलेली गाणी सादर केली जातात.

ज्युक बॉक्स 60

1956 ते 1968 या दशकातील हिंदी चित्रपट संगीतावर आधारीत हा कार्यक्रम आहे.

सूर तेची छेडिता

हा कार्यक्रम श्री.विश्वास शेरीकर सादर करतात. या कार्यक्रमात विविध सामाजिक विषयांवर माहिती दिली जाते तसेच मराठी चित्रपटातील गाणी प्रसारित केली जातात.

हमराज

हा कार्यक्रम रोज सकाळी 7.30 ते 8 प्रसारित होतो. श्री.संतोष पाटील सदर कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमात 1956 च्या पूर्वीची हिंदी चित्रपटामधील गाणी श्रोत्यांना ऐकविली जातात.

To know more visit us on www.vishwasdnyanprabodhini.com/radio-vishwas-90.8