विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक

Vishwas Bank सहकार्यम यशोधनम अस संस्कृत तत्व प्रचलित आहे. या जोडीला ग्राहकांचे समाधान, त्यांचा विश्वासाच्या आधारावर ‘विश्वास बँकेने’ नेत्र दीपक प्रगती केली आहे, बँकेने नेत्र दीपक प्रगती केली आहे. बँकेने सर्वोत्तम कामगिरी करीत गेली २० वर्ष सातत्याने लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे तर रिजर्व्ह बँक ऑप इंडियाच्या इन्स्पेक्शनमध्ये श्रेणी प्राप्त आहे.

चिकाटी, एकाग्रता, विश्वास, समाधान, हा विश्वास को-ऑप. बँकेचा पाया आहे. चीकाटीपुर्ण कठोर परिश्रम व ग्राहक केंद्रित एकाग्रता यांच्या जोरावरच आमच्या ग्राहकांमध्ये आम्ही विश्वास व समाधानाचे दान टाकू शकलो. आमचा वेगाने वाढणारा ग्राहक वर्ग व प्रचंड संख्येचा सध्याचा समाधानी ग्राहक वर्ग ह्या दोघांमुळेच आम्ही नाशिक मधील एक अग्रगण्य व आगळीवेगळी बँक म्हणून नावारूपास येऊ शकलो.

पारदर्शकता व कार्यान्वित नियंत्रण राखण्यासाठी विश्वास बँकेने स्वतःची अशी विशिष्ट व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित केली. ह्या व्यवस्थापन माहिती प्रणालीचे सादरीकरण महाराष्ट्राचे सहकार आयुक्त सहनिबंधक तसेच महाराष्ट्रातील सर्व सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांसमोर करण्यात आले. आम्हाला हे सांगण्यास अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या सहकार खात्याने आम्ही विकसित केलेली व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना लागू केली आहे.

सामाजिक आघाडीवर विश्वास बँक नेहमी सक्रीय असते. स्वयं-सहाय्यता गटांना अर्थसहाय्य असो, दारिद्ररेषेखालील महिलांना आर्थिक मदत असो, दंगल ग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक व वैद्यकीय मदत असो विश्वास बँक नेहमी आघाडीवर असते.

केंद्र सरकारची ‘सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना’ राबविणारी विश्वास बँक हि एकमेव सहकारी बँक आहे. नाशिक महानगर पालिकेच्या सहयोगाने विश्वास बँकेने स्वयं-सहाय्यता बचत गटांना आर्थिक पुरवठा केला. जवळजवळ ४०० महिला सभासद असणारया ९० बचत गटांना बँकेने आत्ता पर्यंत कर्ज पुरवठा केला आहे.

तळागाळातील लोकांना अत्यंत उच्च व प्रगत अशा बँकिंग सुविधा पुरवणे हे विश्वास बँकेचे प्रथम उद्दीष्ट आहे. हे सर्व साकार करण्यासाठी बँकेने गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा व कर्मचारी यावर आपल्या संसाधनांचे वाटप केले आहे. जी मुल्ये आम्ही जतन केली आहेत तीच आम्हाला आमची सामाजिक बांधिलकी संभाळण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

३१ मार्च २०१७ अखेरीस विश्वास को-ऑप. बँकेची ठळक वैशिष्ट्ये
एकूण ठेवी ३१८ कोटी ६४ लाख
एकूण कर्ज १७८ कोटी ६९ लाख
गुंतवणूक १३५ कोतो ४३ लाख
वसुली टक्केवारी ९७.८४%
निव्वळ एन.पी.ए १.६८%
खेळते भांडवल ३४७ कोटी ४५ लाख
एकूण व्यवसाय ४९७ कोटी ३३ लाख
एकूण सभासद ९७८७

To know more visit us on www.vishwasbank.com