अशी निराळी व्यक्तिमत्व सार्या समाजासाठी असतात. समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असते. विश्वास ठाकूर यांच्या सामाजिक, क्रीडा, आर्थिक क्षेत्रातील अनुभवाची ही शिदोरी देश पातळीवरील विविध वित्तीय संस्थांनाही कामी आली. क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील संघटनात्मक बांधणी या क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
सहकारी बँकांचे कामकाज अधिक चांगल्या कार्यपद्धतीने व्हावे, यासाठी विश्वास ठाकूर यांनी रिझर्व्ह बँकेस सादर केलेल्या 6 शिफारशींपैकी 3 शिफारशी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गर्व्हनर डॉ. बिमल जालान यांनी स्वीकारल्यात.
शहरी भागातील गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरु केलेल्या स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत दारीद्रय रेषेखालील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य करणारी सहकार क्षेत्रातील पहिली बँक, डिसेंबर 2011 मध्ये नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यातर्फे या उपक्रमाची लेखी प्रशंसा.
मालेगांव दंगलीमधील अत्यंत नाजुक परिस्थितीत श्री. विश्वास ठाकूर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विशेषतः मुंबईच्या पत्रकारांना कळत-नकळत गैरसमज निर्माण होणार्या बातम्या प्रसिद्ध करतांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच विश्वास बँकेतर्फे मालेगावमधील दंगलग्रस्तांना मालेगांव मर्चंट बँकेच्या सहयोगाने वैद्यकीय व आर्थिक मदत कार्याची नाशिकच्या जिल्हाधिकार्यांकडून दखल व प्रशंसा.
रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतीगृहाची अत्यंत दुरावस्था झाली होती. व मुलभूत सुविधांचा अभाव होता. त्याठिकाणी विश्वास बँकेतर्फे सतरंज्या, गाद्या, पंखे, ट्युबलाईट, आदी वस्तू पुरविण्यात आल्या. तसेच शौचालय व खिडक्या यांची दुरुस्ती करण्यात आली. ज्याद्वारे तेथील विद्यार्थींनीचे जीवन सुखकर झाले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) ह्या अंध व्यक्तींसाठी सेवाकार्य करणार्या संस्थेला विश्वास बँक भरघोस असे आर्थिक सहाय्य वेळोवेळी करत असते. तसेच नॅबच्या भावी योजना, विविध पुरस्कारांसाठी सुद्धा विश्वास बँकेने प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारी 2007 रोजी संपन्न झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धेत विश्वास बँकेतर्फे मुख्य समन्वयक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेत विविध प्रवर्गातील सुमारे 2500 अपंग खेळाडूंची राज्यातून उपस्थिती.
अपंगांसाठीच्या राज्यस्तरीय 6 व्या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या कार्याध्यक्षा मा. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत गौरव- सन्मान.
भारत खर्या अर्थांने जगातील सर्वात मोठा लोकशाही देश व्हावा, याकरीता प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. विश्वास ठाकूर यांनी प्रत्येक मतदाराला मतदान करणे बंधनकारक करावे, अशा आशयाची एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर या जिल्ह्यांच्या मिळून होणार्या नाशिक विभागातील सर्व सहकारी बँकांचे अध्यक्ष व संचालक यांच्यासाठी 2 दिवसांचे विशेष प्रशिक्षण केंद्रशासित प्रदेश दमण व अलिबाग येथे यशस्वीरीत्या आयोजित केले. या प्रशिक्षणात 104 सहकारी बँकांचे अध्यक्ष व संचालक यांनी सहभाग नोंदविला.
‘‘हमारी दौड… सपनोंकी और…’’ हे ब्रीद वायय घेऊन 15 ते 35 वयोगटातील युवतींसाठी ‘आनंदींचा उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा.सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले.
देशाच्या सक्षम नागरीक घडविणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या माहितीच्या युगाच्या विस्फोटामुळे अपूर्ण माहिती असलेला युवावर्ग इंटरनेटच्या मायाजालात दिवसेंदिवस अडकत जातांना दिसतो आहे. या वर्गाला या मायाजालाचा स्वत।च्या तसेच समाजाच्या सक्षमीकरणासाठी कसा उपयोग करावा यासारख्या अनेक विषयांवर खेळांच्या माध्यमातून चर्चा या आनंदी उत्सवात झाली. भविष्यात या युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यशाळा प्रशिक्षण शिबीरे यांचे आयोजन या माध्यमातून करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, सबलीकरण, सुरक्षितता या विषयांवर प्रामुख्याने यात भर देण्यात येणार आहे.
युवा म्हणजे एनर्जीकाहीही घडवण्याची तयारी, कल्पना आणि आवड. युवा म्हणजे सळसळतं रयत. पण सध्या एकुलता एक मुलगा किंवा मुलगी, प्रसार माध्यमांचं माणसाच्या जगण्यावरचे आक्रमण, माहिती तंत्रज्ञानाचा अफाट मारा, सर्व वयोगटांसाठी एकच माहितीची सहज उपलब्धता, सर्वांच्या हातात सहज आलेला मोबाईल, छोटी छोटी होत जाणारी कुटुंब, तरुणांच्या सामाजिक संघटनांचे बदलते स्वरुप, राजकारण्यांनी पोसण्याची युवा वर्गाला लावलेली सवय आणि त्यामुळे जास्तीत जास्त युवा वर्ग एका विचित्र गोंधळाच्या मन।स्थितीत अडकला आहे. एकीकडे पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही नोकरी नाही, व्यवसाय करण्याची हिंमत देणारे वातावरण किंवा प्रशिक्षण नाही आणि नेमकं कुठे अडलं आहे हे शोधायला मदत करणारी सक्षम, सर्वांना उपलब्ध असलेली यंत्रणा नाही आणि हा कोंडमारा सांगायला, मनमोकळं करायला विडासाच्या जागा नाहीत याच जाणीवेतून विचारमंथन होण्यासाठीविश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक व सारस्वत को-ऑप.बँक लि.,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओविश्वास 90.8 समुदाय रेडिओ, डॉ.वसंत पवार मेडिकल कॉलेज नाशिक, गोसावी बहुउद्देशीय संस्था नाशिक, अभिव्ययती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नाशिक, सम्यक पुणे, मानस व्यसनमुयती केंद्र नाशिक, समाजकार्य महाविद्यालय नाशिक व मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुयत विद्यमाने युवांसाठी ‘ मैत्र कारवाँ 2016’चे आयोजन करण्यात आले होते.
दिशा शैक्षणिक उपक्रम आणिविश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, नाशिक यांचे संयुयत विद्यमाने श्रीमती सुधा मेहता व त्यांच्या सहकार्यांनी चालविलेला ‘दिशा शैक्षणिक उपक्रम’ हा एक नाविन्यपूर्ण आहे. श्रमिक, कष्टकरी व मजुर कुटुंबातील, विशेषत। आनंदवी व परिसरातील निम्न मध्यमवर्गीय व आर्थिक आणि सामाजिकदृष्टया वंचित घटकातील मुले-मुली यांचेमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती व्हावी, त्यांनी त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करून पुढील उङ्ख शिक्षणासाठी प्रेरीत व्हावे, अशा उद्देशाने सदर उपक्रम अविरतपणे सुरु आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. अशोकनगर, सातपूर व सिडको येथे दोन्ही शाळा यशस्वीपणे व गुणवत्तापूर्णपणे सुरु आहेत. दोन्ही शाळांमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमांची शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही शाळा कामगार वस्तीमध्ये असून, जेणेकरुन कामगारवर्गाच्या मुलांची शिक्षणाची गरज येथे पूर्ण होते. धडपडणारे पालक व तळमळीत शिकवणारे शिक्षक हे संस्थेचे बलस्थान आहे. कित्येक विद्यार्थ्यांचा आर्थिक भार शिक्षक उचलतात व शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात.
गेली अनेक वर्षे मा.सुप्रिया सुळे यांच्या समवेत यशस्विनी सामाजिक अभियानाचे मा.श्री.विश्वासठाकूर काम पहात आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे चार लाख बचत गटातील पन्नास लाख महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बिग बझार यांच्याबरोबरील सामंजस्य करार तसेच महावितरण या वीज कंपनीचे बिल वाटप व मीटर रिडींगचे काम या महिला बचत गटांना मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. शासनाच्या विविध योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यासाठी ते यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुयतविद्यापीठाच्या सहकार्याने व सिम्बॉसिएस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे या संस्थेच्या सहकार्यातून व्हर्च्युअल सेंटर (आभासी केंद्र) च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यात मा.श्री.विश्वासठाकूर यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.
नाशिक शहरातील वाहतूकीविषयक नागरिकांमध्ये प्रबोधन व जनजागृती होण्यासाठी नाशिक फर्स्ट या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात दोस्त ऑफ नाशिक (DON) म्हणून विश्वास ठाकुर यांची निवड करण्यात आली होती.