इतर उपक्रम

‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सव
Misal Sarmisal
Misal Sarmisal
Misal Sarmisal
Misal Sarmisal

विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवाचे आयोजन शनिवार 20 व रविवार 21 फेब्रुवारी 2016 रोजी करण्यात आले होते. झणझणीत चटकदार मिसळीचे अनेक प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून देण्यात आले होते. मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. काळ्या मसाल्याची, तर्रीदार, विविधरंगी रस्से, कोल्हापुरी झणझणीत मिसळ, कांदा-लसूण विरहित जैन मिसळ, उपवासाची मिसळ अशी विविधता एकाच ठिकाणी चाखण्याची संधी नाशिककरांना मिळाली. या निमित्ताने चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘नाशिक चौपाटी’ खाद्य उत्सव
Nashik Chaupati
Nashik Chaupati
Nashik Chaupati
Nashik Chaupati

विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत नाशिककर खवय्यांसाठी चटकदार पदार्थांची चंगळ असलेल्या ‘नाशिक चौपाटी’ या अभिनव खाद्य उत्सवात सहभागी झालेल्या नाशिककरांना 150हून अधिक चवदार पदार्थांचा एकाच ठिकाणी आस्वाद घेण्याची संधी मिळाली. सदर महोत्सव शुक्रवार 6 मे ते रविवार 8 मे 2016 रोजी आयोजीत करण्यात आला होता. अतिथ्यचा टेस्टी दहिवडा, पालक चाट, बटाटे वडा, नंदन स्वीट्सचे चाट प्रकार, विजूज्ची चवदार दाबेली, सॅण्डवीच, कुलकर्णीज्ची चमचमीत पावभाजी, सराफ बाजारातील दराडेमामांचा मसाले वडा, गंगेवरील दरोडेंची टिपिकल पॉट आईस्क्रिम, हेरंब फुडस्चे अफलातून खरवस व पियूष, करी लीव्हज्चा स्पेशल केशर तवा पुलाव, एस.आर.केटरर्सचा कोरीएन्टर चाट, फ्राईड आईस्क्रिम, मसाला डोसा, ढोकळा चाट, मूग भजी, चना चटपटा, मययाचे कणीस, बुढ्ढी के बाल, बर्फ गोळा, कोल्ड कॉफी, आईस टी, बन मस्का, ज्यूस सरबत, सोडा, कालाखट्टा, मेयसीकन सॅण्डवीच, मिरची वडी, नागपुरी वडी, स्ट्रॉबेरी कॉफी अशा चटकदार, बहारदार व चवदार पदार्थांचा समावेश होता.

नॉनव्हेज महोत्सव
Non-Veg Festival
Non-Veg Festival
Non-Veg Festival
Non-Veg Festival

विश्वास संकल्प आनंदाचा’ व विश्वास ग्रुप’तर्फे अस्सल चवदार झणझणीत चवींचा मिलाफ असलेला नॉनव्हेज महोत्सव 2016 चे आयोजन करण्यात आले होते.विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओविश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सारस्वत बँक,विश्वास लॉन्स, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुयत विद्यमानेविश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार 9 डिसेंबर, शनिवार 10 डिसेंबर व रविवार 11 डिसेंबर 2016 रोजी संपन्न झाला.

फिश करी, प्रॉन्स बिर्याणी, चिकन बिर्याणी, मुगलाई चिकन, बटर चिकन, केशर चिकन बिर्याणी, बांगडा मसाला, खिमा पाव, अंडा पराठा, बैदा करी, नॉनव्हेज मिसळ, स्नॅयस, सलाड, सुप, सोडा, पान, चहा, खिमा भजी, खिमा करंजी, ग्रीन, खिमा सॅण्डवीच, अळणी मटन खिचडा, मटन लोणचे असे नाविन्यपूर्ण पदार्थ या महोत्सवाचे आकर्षण होते.

नाशिक फास्ट’ खाद्य उत्सव
Nashik Fast
Nashik Fast
Nashik Fast
Nashik Fast

विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमांतर्गत विश्वास ग्रुप’तर्फेविश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओविश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.), सारस्वत बँक, संकलेचा कन्स्ट्रयशन यांच्या संयुयत विद्यमानेविश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून शनिवार 20, रविवार 21 व सोमवार 22 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 या वेळातविश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते.

राजस्थानी साबुदाणा वडा, स्पेशल पायसी खिचडी, पुरी भाजी, पपई पॅटीस, केळी कचोरी, साबुदाणा मंचुरीयन, प्लेन डोसा, मसाला डोसा, पकोडा, पनीर डीश, भगर/आमटी/ठेचा/भाकरी, खुजराचा लाडू, बनाना कटलेट, रताळे हलवा, पपया हलवा, केळी वेफर्स, मिसळ, मिल्क शेकस्, लेमन टी, कोल्ड कॉफी, लेमन आईस टी, ब्लॅक टी, मोसंबी ज्युस, वॉटलमेलन ज्युस, अनार ज्युस, काजू/अंजीर शेकस्, चॉकलेट शेकस् इत्यादी अनेक पदार्थ व ज्युसेसने महोत्सवात रंगत आणली होती.

‘मैत्र पेठेचे’ (सन 1950 ते 1990)
Mitra Pethe School
Mitra Pethe School
Mitra Pethe School
Mitra Pethe School

पेठे विद्यालयाच्या सन 1950 ते 1990 या कालावधीतील इयत्ता 10वी पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (ग्रँड-गेट-टू-गेदर) ‘मैत्र पेठेचे’ या शीर्षकाने आयोजित करण्यात आला होता. रविवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेतविश्वास लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. आपल्याच शाळेतील जुन्या मित्रांना भेटण्याची व गप्पागोष्टी करण्याची संधी यातून मिळाली. या ‘ग्रँड-गेट-टू-गेदर’ निमित्ताने विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात 1400 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

‘लम्हे-84’

पेठे विद्यालय नाशिक 1984 च्या वर्गमित्रांचा ‘लम्हे-84’ हा ग्रृप स्थापन करण्यात आला आहे. त्याचे समन्वयक म्हणूनविश्वास ठाकूर आहेत. लम्हे-84 चा अत्यंत वैशिष्टपूर्ण स्नेहमेळावा त्यांनी आयोजित केला होता. बालपणीच्या मैत्रीला दृढ करण्यासाठी शाळेतील मोरपंखी आठवणींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा प्रत्येकासाठी मैत्रीची पालवी बहरण्यासाठी उपयुयत ठरला. मौज-मस्ती, गप्पा, टप्पा, धमाल करणे असं मेळाव्याचे स्वरुप होते. ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या गुरुवर्याप्रती कृतज्ञता व्ययत करण्यासाठी गुरुवर्य व त्यांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. पहिला स्नेहमेळावा रविवार 28 डिसेंबर 2013 रोजी व दुसरा स्नेहमेळावा रविवार 29 डिसेंबर 2014 रोजी नाशिक येथे संपन्न झाला आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी प्राथमिक निवडणूक प्रक्रिया पाहणी पथकामध्ये विश्वास ठाकूर यांची निवड
Primary Election Process Inspection Squad for US presidential positions
Primary Election Process Inspection Squad for US presidential positions
Primary Election Process Inspection Squad for US presidential positions
Primary Election Process Inspection Squad for US presidential positions

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’ या कार्यक्रमांतर्गत तेथील सध्याच्या कार्यरत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अभ्यासदौर्‍यासाठीविश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्षविश्वास ठाकूर (एन.सी.पी.) यांच्यासह आ.अनंत गाडगीळ, पुणे (काँग्रेस आय), निशांत गांधी, नागपूर (बीजेपी) व श्रीधर पाटील, ठाणे (शिवसेना) यांची निवड करण्यात आली.

अ‍ॅम्बसी ऑफ दि युनायटेड स्टेटस्, नवी दिल्ली यांनी मुंबईच्या यु.एस. कौन्सलेट जनरल यांचेमार्फत या चौघांची शिफारस वॉशिंग्टन डीसी येथील युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेच्या फॉरेन डिपार्टमेंट यांचेकडे केली होती. त्यांच्यामार्फत या अभ्यासदौर्‍याला मान्यता देण्यात आलेली असून या संपूर्ण दौर्‍याचा खर्च अमेरिकन गव्हर्नमेंट यांच्या सहकार्याने होत असून या चौघांनाही राजनैतिक दर्जा देण्यात आला. दहा दिवसांच्या अभ्यासदौर्‍यातविश्वास ठाकूर यांनी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे राजनैतिक नेते, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व राजकीय विश्‍लेषक यांच्या भेटी घेऊन अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील निर्णायक टप्प्यातील विशेष राजकीय घडामोडी या चौघांनाही पहावयास मिळाल्या असून वॉशिंग्टन डीसी, न्यू हॅमशायर व सियाटेल या राज्यातील निवडणुकीच्या प्राथमिक फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.विश्वास ठाकूर गेली 20 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक राजकीय घडामोडींमध्ये विशेष कार्यरत असतात.

सन 1970 साली या उपक्रमांतर्गत मा.खा.शरद पवार, विठ्ठलराव गाडगीळ, श्री. जॉर्ज फर्नांडीस, एस.एस. जोशी हे नेते त्या वेळची निवडणूक प्रक्रीयेचा अभ्यास करण्याकरीता अमेरिकेला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील या चौघांना ही प्रथमच मिळत आहे, हे विशेष. दर चार वर्षांनी संपन्न होणार्‍या अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीसाठी अमेरिकन सरकार अध्यक्षीय निवडणूकीसाठी अमेरिकन सरकार जगातील एका देशातील चार प्रतिनिधींना निमंत्रित करतात. यानंतर भारताचा नंबर हा तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा येणार आहे. श्री.विश्वास ठाकूर यांची निवड विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिकच्या गौरवात मानाचा तुरा खोवणारी आहे.