जीवन पट

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक. उच्चस्तरीय समिती सदस्य : यूनोने 2012 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ जाहीर केल्यानंतर भारत सरकारने हे वर्ष साजरे करण्यासाठी नेलेल्या उच्चस्तरीय समितीचे एकमेव अशासकीय सदस्य.

समितीचे अध्यक्षपद

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘सहकारी बँकांमधील व्यवस्थापन’ या पदविकेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी नेलेल्या समितीचे अध्यक्षपद.

सदस्य

‘महाराष्ट्राचे युवा धोरण’ ठरवण्यासाठी नेलेल्या समितीचे सदस्य. (महाराष्ट्र शासन)

अध्यक्ष

‘महाराष्ट्राचे युवा धोरण’ अंतर्गत नेलेल्या ‘कला संस्कृती मनोरंजन’ ह्या उपसमितीचे अध्यक्षपद. (महाराष्ट्र शासन)

माजी संचालक

नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप बँक अ‍ॅन्ड क्रेडिट सोसायटीज. (NAFCUB) नवी दिल्ली.

माजी अध्यक्ष कार्याध्यक्ष व संचालक

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन, नाशिक.

संयुक्त समन्वयक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या राज्यस्तरीय ‘नव महाराष्ट्र युवा अभियान’ चे संयुक्त समन्वयक पद.

सल्लागार

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ही सहकार क्षेत्राला उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारी व स्वत:चे संशोधन अभ्यास केंद्र
असणारी पहिलीच संस्था.

कार्याध्यक्ष व संचालक

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन. लि., मुंबई.

कार्याध्यक्ष

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, नाशिक : थोर राजकारणी यशवंतराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ 1985 मध्ये ‘यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान’ ची स्थापना. संस्थेमार्फत सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी व सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय प्रगल्भतेसाठी अनेक उपक्रम व कार्यक्रम. ह्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये राजकीय, समाजकारणी, अग्रगण्य उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व सुप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असतो.

संचालक, यशस्विनी सामाजिक अभियान

कंपनी कायद्याअंतर्गत ‘ना नफा ना तोटा’ ह्या तत्त्वावर ‘यशस्विनी सामाजिक अभियान’ ची नोंदणी झालेली आहे. समाजाच्या भल्यासाठी, विशेषत: सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी विविध आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. स्वयं-सहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना भारतात तथा जगात बाजारपेठ उपलब्ध करून देणे, लघु उद्योगांना प्रोत्साहन अशा प्रकारचे उपक्रम संस्था राबवते. इतर दोन संचालकांध्ये श्रीमती सुप्रिया सुळे व डॉ.रवी बापट यांचा समावेश आहे. मार्गदर्शक मंडळामध्ये श्री.अशोक गांगुली (फर्स्ट सोर्स सोल्युशन्स्, आनंद बझार पत्रिका यांचे अध्यक्ष), श्रीमती ललिता गुप्ते (आयसीआयसी आयव्हेंचर्स), श्री.नरोत्तम सक्सेरिया (उपाध्यक्ष-अंबुजा सिमेंट), श्री.यशवंत थोरात (नाबार्ड चे माजी अध्यक्ष),
श्रीमती पद्मिनी सोमाणी (अध्यक्ष-नरोत्तम सक्सेरिया फांउडेशन).

माजी कोषाध्यक्ष

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक : देशाच्या बौद्धिक भांडवलाचा योग्य विनियोग तसेच साहित्य, भाषा, शास्त्र, वैद्यक, शिक्षण, नाटक, इ. क्षेत्रामधील ऊर्जेचा पूरेपूर वापर तसेच इतर अनेक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी स्थापन झालेली संस्था, आदिवासी समाजाच्या विकासासाठी सुद्धा कुसुमाग्रज प्रतिष्ठान ‘कार्यरत असते. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 26 मार्च 1990 साली स्थापन झालेली संस्था.

माजी उपाध्यक्ष

वसंत व्याख्यानमाला – वसंत व्याख्यानमालेची स्थापना ९६ वर्षापूर्वी झालेली असून, ह्या व्याख्यान मालेत आतापर्यंत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्रवीर सावरकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, ई., अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. दरवर्षी ३१ दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो.

माजी संचालक

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण नियामक मंडळाचे, सदस्य ह्या मंडळामध्ये 16 सदस्यांचा समावेश असून या मध्ये भरीव व धोरणात्मक काम करणाऱ्या इंजिनीअरिंग, पोलिटेकनिक, आयटी, इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींची निवड केली.

आजीव सदस्य

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. महाराष्ट्र साहित्य परिषद. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन. भारत-पाकिस्तान शांतता व लोकशाही मंच. संवाद वाङमयीन संस्था, मुंबई क्रिकेट असोसिएशन, कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिस्मेटिक अ‍ॅण्ड रेअर आयटेम्स्, नाशिक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

शासकीय सदस्य

1) नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचा आढावा व त्यात सुधारणा यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे श्री. डी. एम. सुखटणकर (निवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आलेल्या समितीचे सदस्य.

2) स्वयं-सहाय्यता गटांच्या विकासासाठी सहकार आयुक्त, महाराष्ट्र यांनी 2002-03 मध्ये नेलेल्या ‘कोअरग्रुप समिती’चे सदस्य.

3) ‘संपर्क व पत्रकारिता’ मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठाने नेलेल्या समितीचे सदस्य.

4) नागरी सहकारी बँकांच्या कामकाजासंदर्भात सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी नेलेल्या ‘अभ्यास गट समिती’ चे सदस्य.

5) महाराष्ट्र सरकारने 2002-03 व 2003-04 साली नेलेल्या ‘सिंहस्थ कुंभमेळा समिती’ चे सदस्य.

6) महासंचालक, यशवंतराव चव्हाण अ‍ॅकेडमी ऑफ डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (यशदा) यांनी 7 नोव्हेंबर 2003 रोजी नेलेल्या ‘थिंक टँक समिती’ चे सदस्य. ‘यशदा’ महाराष्ट्र सरकारची प्रशिक्षण देणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था. केंद्र व राज्य सरकारतर्फे अर्थपुरवठ्यावर चालणारी संस्था यशदा तर्फे सरकारी, निमसरकारी आस्थापनांमधील अधिकारी, व्यवस्थापक, उच्चपदस्थांना प्रशिक्षण दिले जाते.

7) डावखुर्‍या व्यक्तींची असोसिएशन, नाशिक शाखा.

8) ‘व्यवस्थापन माहिती प्रणाली व आंतरराष्ट्रीय लेखा मानक’ यावर अभ्यास करण्यासाठी सहकार व वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी नेलेल्या समितीचे सदस्य.

9) महाराष्ट्र सरकारतर्फे 31 जुलै 2006 ते 9 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान ‘फळे, फुले व भाजीपाल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ’ ह्या विषयावर अभ्यासासाठी लंडन, अ‍मस्टरडॅम, बेल्जियम, फ्रान्स आदी युरोपिअन देशांच्या अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या अभ्यासगटाचे सदस्य.

10) सचिव : ज्येष्ठ नागरिक, शिक्षण आणि तांत्रिक क्षेत्र, अनाथ बालके, विधवा ह्यासाठी काम करणार्‍या ‘साथी चॅरिटेबल ट्रस्ट’चे सचिव.

11) तांत्रिक समितीचे समन्वयक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘स्वयं-सहाय्यता गटांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ तयार करण्यासाठी नेलेल्या तांत्रिक समितीचे समन्वयक पद.

12) सचिव : नाशिकमध्ये 28 जानेवारी 2005 ते 30 जानेवारी 2005 मध्ये भरलेल्या ‘78 व्या मराठी साहित्य संम्मेलनासाठी’ साठी नेलेल्या आयोजन समितीचे सचिवपद अत्यंत नीटनेटक्या आयोजनामुळे अनेक मान्यवरांकडून प्रशंसा.

13) सभासद : कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकरांनी 1950 साली स्थापन केलेल्या नाशिकच्या सांस्कृतिक विकासात मोलाची भर घालणार्‍या ‘लोकहितवादी मंडळ’ ह्या संस्थेचे सदस्य.

14) सदस्य : ‘सहकारी बँकांसाठी आदर्श नियमावली’ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेलेल्या समितीचे सदस्य.

15) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार विभागाचे राज्यप्रमुख म्हणून नियुक्ती.

16) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते पदी निवड.

17) सल्लागार आयसेक : ‘आयसेक’ ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेली सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांवर काम करणारी संस्था आहे.

18) सार्वजनिक वाचनालय नाशिक या 176 वर्षाची सांस्कृतिक परंपरा असलेल्या संस्थेच्या विविध प्रश्नांची चौकशी व सोडवणूक करण्यासाठी नेलेल्या अभ्यास समितीत सन्माननीय सदस्य म्हणून नियुक्ती.

19) नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन तर्फे नवी दिल्ली येथे बुधवार दि. 4 जानेवारी ते शुक्रवार दि. 6 जानेवारी 2017 रोजी संपन्न झालेल्या कॉन्फरन्सचे चेअरमन.

20) कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत दुबई येथे संपन्न झालेल्या वाचक मेळाव्यात प्रमुख अतिथी सन्मान.