युवकांसाठी

राज्याचे युवा धोरण ठरविण्याच्या समितीवर विश्वास ठाकूर
Yuva Policy
Yuva Policy

देशाचे युवाधोरण सन २००३ मध्ये जाहीर करण्यात आले होते. राज्यातील १३ ते 35 वयोगटातील युवा लोकसंख्येचा विचार करता देशाच्या युवा धोरणाच्या अनुषांगाने राज्याचे स्वतंत्र युवा धोरण तयार झाल्यास त्याद्वारे युवक कल्याणाच्या विविध योजना राबविणे शक्य आहे.या पार्श्वभूमीवर एकंदरीतच राज्याच्या युवक कल्याण क्षेत्राचा आढावा घेऊन नवीन धोरण ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.देशाचे युवक धोरण,२००३ व त्यानंतर युवक कल्याण क्षेत्रात झालेले विविध बदल विचारात घेऊन राज्याचे नवीन युवा धोरण ठरविण्याकरिता महाराष्ट्रा राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण खात्यातर्फे समिती नियुक्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला.या शासकीय निवड समितीवर सदस्य म्हणून विश्वास ठाकूर यांची निवड झाली होती.

नव महाराष्ट्र युवा अभियानातर्फे गेल्या अनेक वर्षा पासून अभियानाच्या निमंत्रक सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे युवा धोरण जाहीर करावे यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या व त्या माध्यमातून युवकांची मते जाणून घेण्यात आली.युवा धोणनाचा अभ्यासपूर्ण जाहीरनामा तयार करण्यात आला व जाहीरनाम्याचा अंतिम मसुदा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे १२ जानेवारी २०१० रोजी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.या संपूर्ण युवा धोरण जाहीरनामा संयोजन समितीत श्री.विश्वास ठाकूर कला व संस्कृती उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.

मीच माझा देश घडविणार…
Voter Poster
Voter Poster

नव मतदार नोंदणी अभियानाच्या पोस्टरचे आनावरण चोला मंडलम बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिद धटिंगण यांचे हस्ते करण्यात आले.निवडणूक आयोगाच्या वतीने १ ते ३१ जुलै दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे.

सदर अभियानाला प्रतिसाद देत आपल्या विश्वास बँकेच्या वतीने देखील सदर मतदार नोंदणी अभियान नव मतदरांपर्यंत पोहचवण्यासाठी उस्फुर्त पणे प्रयत्न केले जाणार आहे. विश्वास को-ऑप बँकेच्या नाशिक शहरातील विविध शाखांमध्ये देखील मतदार नोंदणी अर्ज नवमतदरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच विविध महाविद्यालयात देखील पोस्टर च्या माध्यमातून मतदार होण्यासाठी युवकांना आवाहन करण्यात आले.

आनंदींचा उत्सव 2016
Happy Celebration
Happy Celebration

‘‘हमारी दौड… सपनोंकी और…’’ हे ब्रीद वायय घेऊन 15 ते 35 वयोगटातील युवतींसाठी ‘आनंदींचा उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा.सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले.

देशाच्या सक्षम नागरीक घडविणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या माहितीच्या युगाच्या विस्फोटामुळे अपूर्ण माहिती असलेला युवावर्ग इंटरनेटच्या मायाजालात दिवसेंदिवस अडकत जातांना दिसतो आहे. या वर्गाला या मायाजालाचा स्वत।च्या तसेच समाजाच्या सक्षमीकरणासाठी कसा उपयोग करावा यासारख्या अनेक विषयांवर खेळांच्या माध्यमातून चर्चा या आनंदी उत्सवात झाली. भविष्यात या युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यशाळा प्रशिक्षण शिबीरे यांचे आयोजन या माध्यमातून करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, सबलीकरण, सुरक्षितता या विषयांवर प्रामुख्याने यात भर देण्यात येणार आहे.

युवकविश्व – युवकांचे सशक्त व्यासपीठ

Yuvakvishwa युवकांच्या विचारविश्वाला हक्काचे सशक्त व वैचारिक व्यासपीठ देण्यासाठी ‘युवकविश्व मासिकाची निर्मिती केली. आधुनिक जीवन जाणिवांना निश्चित दिशा देण्यासाठी या अंकाचे जोरदार स्वागतही झाले. समकालीन विषयांना प्राधान्य आणि विचारांची क्षितिजे रुंदावण्यासाठी लेखनाच्या विविध प्रकारांचा वेध हे अंकाचे वैशिष्ट्य होते. युवकांच्या अंगी असलेल्या कला गुणांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ म्हणून” युवकविश्व” लोकप्रिय मासिक होते.

भाषा, जीवन व संस्कृतीचा वेध घेणारे भाषेविषयक माहितीपूर्ण लेख, कथा, कादंबरीची निर्मिती प्रक्रिया, महामानवांची विचारधारा यांचा अन्योन्यसाधारण संबंध हे अंकाचे शक्तीस्थळ होते. विविध भाषेतील ग्रंथ, पुस्तकांची माहिती, लेखकांची लेखनामागची निर्मिती प्रक्रिया, वाचकांचे कुतुहल जागणवणारे असे. ख्यातनाम लेखक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांचा स्नेह लाभलेले विश्वास ठाकूर यांनी पुस्तकवाचनाच्या छंदातून ग्रामीण भागातील लेखक व कवींच्या विचारांना व्यक्त होण्यासाठी युवकविश्व अल्पावधीतच मित्र ठरले.

“पंजाब”प्रश्नांचा वेध घेणारे युवकविश्वाचा विशेषांक भारतीय समाजकारणाचा स्थित्यंतरांची जाणीव करून देणारा आहे. विश्वास ठाकूर यांनी आपल्या काही मित्रांसोबत पंजाब दौरा केला आणि त्यातून तेथील प्रश्नांची दाहकता समजावून घेतली. ‘पंजाब काल, आज आणि उद्या’, पंजाब प्रश्न-एक आढावा या दीर्घ लेखातून पंजाबमधील जनता व प्रशासनाची मानसिकता यांची चर्चा उद्बोधक आहे.

आरोग्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांविषयी माहितीपूर्ण सदरे उपयुक्त आहेत. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी नवी वैचारिक जाणीव रुजवण्याचे कार्य युवकविश्व माध्यमातून झाले आहे. विज्ञानविषयक जनजागृती, अंधश्रद्धाविरोधी प्रबोधनात्मक चळवळ, पर्यावरण जागरुतकता व व्यवसनमुक्तविरोधी लेख विचारदर्शक आहेत.

कुठल्याही काळाचे प्रतिबिंब हे त्या काळात कार्यरत असलेले प्रसारमाध्यमे, लोकपरंपरा यातून उमटत असते आणि समाजाचे खरे चित्र समोर येत असते. एक प्रकारे तो समाजाचा चालता बोलता इतिहास असतो. तोच इतिहास जपण्याची जपवणूक करण्याची मौलिक जबाबदारी विश्वास ठाकूर यांच्या संपादनाखाली युवकविश्व मासिकाने घेतली आणि त्याला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अंकाचे आशयपूर्ण मुखपृष्ठ व आतील लेखनाला पूरक अशी आशयचित्रे संदर्भमूल्य वाढवणारेच आहे.

डॉ. सीमा राव यांची मुलाखत

Seema Rao पोलीस आयुक्तालय नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी च्यावतीने भारतातील पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षक डॉ. सीमा राव यांचा प्रेरणादायी अश्या मुलाखतीचा कार्यक्रम विश्वास लॉन्स येथे संपन्न झाला.

डॉ. सीमा राव यांची मुलाखत सौ वैशाली बालाजीवाले यांनी घेतली.

यावेळी मुलाखतीत डॉ सीमा राव यांनी महिलांनी स्वतःला कमी न लेखता कोणत्याही परिस्थितीला समोर जण्यासाठी सक्षम रहाण्याचा असं आवाहन केल तसेच युवतींना स्वरक्षणाच्या टिप्स दिल्या .सदर कार्यक्रमास युवक युवतींने उस्फुर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमावेळी मंचावर उपस्थित पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, डॉ. मनोज शिंपी, सुधीर संकलेचा, लक्ष्मीकांत पाटील, सौ कांगणे, अँड हर्षवर्धन बालाजीवाले, दिपाली खडकर