नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख, आनंदाची जाणीव असलेला विश्वास संकल्प आनंदाचा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 31 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी व कवी, गीतकार संदीप खरे यांची रसिकप्रिय मैफल ‘आयुष्यावर बोलू काही’ यानिमित्ताने सादर करण्यात आली. शब्द, सुर व गप्पा यांची सांगड असलेला हा कार्यक्रम रसिकांना निश्चितच आवडणारा होता.
“अंदाज आरशाचा वाटे, खरा असावा । प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा” असा माणूसकीचा गहिरा रंग आणि सुरांची बरसात घेऊन जगण्यातील माणूसपणाच्या मूल्यांचा शोध घेत काळजाला भिडणार्या एकाहून एक सरस मराठी हिंदी गझलांनी रसिकांना अनोखा आनंद दिला निमित्त होतेविश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत नववर्षाच्या पुर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख, आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतूनविश्वास ग्रुप तर्फे गझल सम्राट भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या अनोख्या मैफीलीचे आयोजन रोटरी यलब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातूनविश्वास लॉन्स येथे शनिवार 31 डिसेंबर 2016 रोजी करण्यात आले होेते.
सुखदु:खाच्या व्यवस्थापनाची गोष्ट सांगणे म्हणजे गझल अशा आशयाची अनुभूती शब्द सुरांतून प्रकट होत होती. अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले तर दुख: वाटण्याचा प्रवासही सहज झाला असता त्यासाठी ‘जगणार्याला जीवन कळते, पळणार्याला नाही’ अशा शब्दात जगण्याची महती गझलसम्राट भीमराव पांचाळे यांनी पेश केली. ‘‘जखमा अशा सुगंधी, झाल्यात काळजाला, केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा’ यातून जगण्याचा शोध घेता घेता रसिक अंर्तमुख झाले. जाओ शिसे का बदन लेके, मज नको हे गगन, जीवनाला दान द्यावे लागते, हा असा चंद्र अशी रात, तु नभातले तारे माळलेस का, ए सनम आँखो की मेरी, भळभळते सांगतेस का, उगा भांडतेस, कारणे नाहीत मोठी, गरीबाच्या लग्नात नवरी. अशा लोकप्रिय गझलांनी मंत्रमुग्ध केले.
समाजात वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचक चळवळीने साता समुद्रापार झेप घेतली आहे. विनायक रानडे यांची मुख्य संकल्पना असलेली ही चळवळ वाचक चळवळीचा मानबिंदू ठरली आहे. ‘ग्रंथ तुमच्या दारी, दुबई’ व ‘आमी परिवार’ यांच्या संयुयत विद्यमाने भारताबाहेर होणारा पहिलाच वाचक मेळावा दुबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला 800 पेक्षा जास्त मराठी भारतीय वाचक उपस्थित होते. दुबईत 2016 हे वाचन वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले होते व ‘ग्रंथ तुमच्या दारी, दुबई’ या उपक्रमाची तसेच वाचन मेळाव्याची दखल गल्फ न्युज या सुप्रसिद्ध स्थानिक वृत्तपत्रात घेण्यात आली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या 2013 ते 2018 निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री.विश्वास ठाकूर यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असतांना कलावंताचे प्रश्न सांस्कृतिक संस्थांचे प्रश्न यांची अचूक जाण श्री.विश्वास ठाकूर यांना आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निपक्ष।पातीपणे कार्य करण्याचा आदर्श त्यांनी दिला.
हौशी, प्रायोगिक, समांतर, बालरंगभूमी अशा विविध नाट्यचळवळींना ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम श्री. ठाकूर यांनी केले आहे. बालनाट्य शिबीरांच्या माध्यमातून व्ययतीमत्व विकास शिबीरांचे सातत्याने आयोजन ते करत असतात. बालरंगभूमीवर अनेक महत्वपूर्ण प्रयोगासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
विश्वास को -ऑफ -बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,नाशिक व यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,या उद्देशाने गरंथ तुमच्या दरी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे .सदर उपक्रमात एक पुस्तक पेटी लहान मुलांकरिता विविध ठिकाणी पोहचविता येणार आहे .हा उपक्रम केवळ राज्यात नव्हे तर देशातील एकमेव उपक्रम आहे .यातून बँक Third Generation ला आपल्या कडे Attract करेल.त्याचा फायदा बँकेला भविष्यात व्यावसाय वाढवण्यास निश्चितच होईल. आता पर्यंत 100 ग्रंथ पेट्या विविध संस्थांना प्रदान करण्यात आल्या आहे.